साहित्यिक डॉ. सुनील सावंत यांचा सविस्तर परिचय

डॉ. सुनील सावंत हे मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील साहित्यिक आहेत. त्यांनी १९७५ पासून लेखनास प्रारंभ केला असून त्यांची मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत २१ पुस्तके सन २०२५ पर्यंत प्रकाशित झाली आहेत.
त्यांनी कविता, कथा, ललित, कादंबरी, नाटक इत्यादी प्रकारांमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत लेखन केले आहे.

त्यांची आजपर्यंत प्रकाशित साहित्य संपदा मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत -
• एक मराठी संयुक्त काव्यसंग्रह • चार मराठी काव्यसंग्रह • दोन मराठी कथासंग्रह • एक मराठी अनुवादित ललित संग्रह • एक मराठी आध्यात्मिक पुस्तक • चार मराठी संपादित काव्यसंग्रह • एक मराठी संपादित चरित्रात्मक पुस्तक • डॉ. सुनील सावंत यांच्या कवितांवरील समीक्षेचे एक पुस्तक • एक मराठी अनुवादित आध्यात्मिक ग्रंथ • एक हिंदी काव्यसंग्रह • एक हिन्दी आध्यात्मिक पुस्तक • एक हिन्दी शोध ग्रंथ • एक इंग्रजी संपादित ललित पुस्तक • एका मराठी कादंबरीचा इंग्रजी भावानुवाद.

त्यांनी हिंदीत भाषांतर रुपांतर केलेले मराठी नाटक "आंत खोल कुठेतरी", हिंदीत कथा, कविता लिहिल्या आहेत. “यातना शिबिर में” हिमांशु जोशी या हिंदी पुस्तकांचे मराठी भाषांतर "काळे पाणी, लाल सूर्य" (भारतीय स्वातंत्र्य वीरांची यातना गाथा) केले आहे.
त्यांनी मराठी भाषेतील कादंबरी इंग्रजी भाषेत भावानुवाद केलेली आहे. सुप्रसिद्ध लेखक ल. सि. जाधव यांच्या "होरपळ" कादंबरीचा इंग्रजी भावानुवाद SINGE केलेला आहे.

त्यांच्या डॉक्टरेट विषयी:
“बैद्यनाथ मिश्र नागार्जुन और मराठी कवी नारायण सुर्वे की कविताओं का तुलनात्मक अध्ययन” या शोध प्रबंधासाठी मुंबई विद्यापीठाने २००१ साली सुनील सावंत यांस डॉक्टरेट प्रदान केली. हा शोध प्रबंध मार्गदर्शक डॉ. श्रीभगवान तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील सावंत यांनी सहा वर्षात पूर्ण केला. ह्यात मराठी व हिंदी कवितांचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. हा प्रबंध हिंदी भाषेत केलेला आहे. हिंदी व मराठी अभ्यासकांना उपयुक्त आहे.


त्यांचे विविध मासिके, दैनिके, दिवाळी अंक यातून विविध साहित्य प्रसिध्द झाले.
काही प्रसिद्धी माध्यमांची नावे : पैंजण, पुढारी, मुंबई सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, शब्दांगण, लोकप्रभा, जुई, विचारभारती, ज्वाला, आरती, राजलक्ष्मी, गमभन, आपली राजधानी, नवअंकुर, अमरेंद्र, अमृतमानस, मॉडर्न मराठी पोएट्री (इंग्रजी भाषांतर), उद्गार, विदूषक, सम्यक, अरुण, पाक्षिक क्रांती, ऐसी अक्षरे, रूची इत्यादी.

त्यांची शैक्षणिक पात्रता : एम.कॉम., एम.ए. (हिंदी), पीएच. डी. मुंबई विद्यापीठातून.
नोकरी: निवृत्त शाखा व्यवस्थापक (इंडियन बँक) .


त्यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
अ) राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार :
१. बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे (१९८१-८२) आयोजित कथाकथन स्पर्धेत प्रोत्साहन पुरस्कार.
२. कोकण मराठी साहित्य परिषदेचा (१९९७-९८) सुप्रसिद्ध साहित्यिक व अर्थतज्ञ श्री. गंगाधर गाडगीळ पुरस्कृत 'लक्षणीय साहित्य निर्मितीचा' सौ. वासंतीबाई गाडगीळ पुरस्कार.
३. मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र राज्य, मुंबई (२०००) साहित्य क्षेत्र योगदान पुरस्कार
४. कोकण मराठी साहित्य परिषदेचा (२०००) कथासंग्रह स्नेहसोबतीस पुरस्कार
५. 'ऐलान' काव्यसंग्रहास महानुभाव विश्वभारती, अमरावतीचा 'साहित्यालंकार पुरस्कार' (२००४)
६. ‘ऐलान’ हिन्दी काव्यसंग्रहास महाराष्ट्र अनुवाद परिषद व तुका म्हणे अनियतकालिक, बुलढाणाचा 'तुका म्हणे' पुरस्कार २००४
७. कोकण मराठी साहित्य परिषदेचा (२००५) काव्यसंग्रह सूर्य दिसत राहील तो पर्यंत.... या पुस्तकास विशेष पुरस्कार.
८. जयंती फाउंडेशन, मुंबईचा मराठी हिंदी साहित्य योगदानासाठी 'गौरव चक्र' पुरस्कार २००७
९. विद्या मॅनेजमेंट अॅण्ड करीअर डेव्हलपमेन्ट इन्स्टिट्युट, प्रभादेवी - मुंबई यांचा साहित्य क्षेत्र योगदानासाठी "साहित्य रत्न” पुरस्कार २००८.
१०. वाङ्मयसेवा प्रकाशन, नाशिक यांचा सूर्य दिसत राहिल तोपर्यंत... काव्यसंग्रहास पुरस्कार २००९
११. पाच काव्य संग्रहातील कवितांमधील 'माणूस' धर्माचा सन्मान, श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान, ठाणे यांचा काव्य गौरव पुरस्कार २०२५
१२. भिरवंडेकर मराठा समाज, सिंधुदुर्ग जिल्हा यांनी केलेला साहित्य क्षेत्रातील कार्याचा विशेष सन्मान ऑक्टोबर २०२५.

ब) आंतरराष्ट्रीय सन्मान - २००७ 'अमेरिकन लायब्ररी ऑफ कॉंग्रेस' वॉशिंग्टन या अमेरिकेतील लायब्ररीत दरवर्षी विविध पुस्तकांची संदर्भ ग्रंथ म्हणून निवड केली जाते. सन २००७ सालाकरिता 'डॉ. सुनील सावंत : कवी आणि कविता' (शामल वेचलेकर व बाळ राणे लिखित) समीक्षा ग्रंथाची निवड झाली. ह्यात ज्वालामुखी, माझी वस्ती मी शोधतोय, मैत्रीण, स्वातंत्र्याची हाक, सूर्य दिसत राहिल तोपर्यंत... या पाच काव्यसंग्रहातील कवितांची समीक्षा आहे.

प्रसार माध्यमातील मुलाखत आणि कार्यक्रमातील सहभाग -
दूरदर्शन, मुंबई :
१९८७ साली दूरदर्शनवरील "युवदर्शन" कार्यक्रमामध्ये मुलाखत.
• मार्च २००४ मध्ये आयोजित आशीर्वाद पुरस्कार वितरण व ऐलान काव्यसंग्रह प्रकाशन कार्यक्रमांचे सह्याद्री दूरदर्शनवरीले बातम्यांमध्ये प्रसारण, दिनांक २१-३-२००४ रोजी.
• जून २००६ मध्ये आयोजित आशीर्वाद पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे सह्याद्री, झी व ई या दूरदर्शनवरील बातम्यांमध्ये प्रसारण, दिनांक १७ जून २००६ रोजी.
• २६ जानेवारी २००८ रोजी आयोजित हिंदी कवी संमेलनात प्रमुख वक्ते या नात्याने सहभाग. त्याचे सहारा, दूरदर्शन, ई टीव्ही, झी टीव्ही या माध्यमातून प्रक्षेपण.
• ३० नोव्हेंबर २०२४ रोजी उत्कृष्ठ वाङमय निर्मितीसाठी मराठी, हिंदी व इंग्रजी आणि ई-बुक करिता "रौप्य महोत्सवी आशीर्वाद पुरस्कार" प्रदान सोहळा दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे आयोजित केला होता. डॉ भालचंद्र मुणगेकर , माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ, डॉ रवींद्र शोभणे , सुप्रसिद्ध साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि श्री . राजीव श्रीखंडे ,जागतिक साहित्याचे अभ्यासक ह्यांच्या उपस्थितीत सदर सोहळा संपन्न झाला. डिसेंबर २०२४ मध्ये, "आपला महाराष्ट" ह्या दूरदर्शन वरील कार्यक्रमात हा सोहळा प्रक्षेपित करण्यात आला.

आकाशवाणी - मुंबई : आकाशवाणीवरील विविध कार्यक्रमात सातत्याने कथाकथन व काव्यवाचन केले आहे.

साहित्यिक डॉ. सुनील सावंत यांची प्रसिध्द साहित्य संपदा
क्र. पुस्तकाचे नाव साहित्य प्रकार प्रसिध्दीचा काळ प्रकाशन संस्था व प्रमुख पाहुणे
१)ज्वालामुखी (संयुक्त काव्यसंग्रह)काव्यसंग्रह१९८४लोक सांस्कृतिक मंच, मुंबई – श्री. बाबुराव बागुल
व श्री. शाहिर साबळे
२)हर्षदाकथासंग्रह१९८५पारिजात प्रकाशन, पुणे – श्री. श. ना. नवरे
३)स्नेहबंध (प्रातिनिधिक काव्यसंग्रह)काव्यसंग्रह (संपादित)१९८६वंदना प्रकाशन, मुंबई – कवी नारायण सुर्वे
४)माझी वस्ती मी शोधतोयकाव्यसंग्रह१९९०वंदना प्रकाशन, मुंबई – मधु मंगेश कर्णिक
५)स्नेहसोबतीकथासंग्रह१९९७चिंतामणी संस्था, सावंतवाडी – प्र. श्री नेरुरकर
६)मैत्रीणकाव्यसंग्रह१९९७वंदना प्रकाशन, मुंबई – प्र. श्री नेरुरकर
७)स्वातंत्र्याची आसकाव्यसंग्रह (संपादित)१९९८वंदना प्रकाशन, मुंबई – मधु मंगेश कर्णिक
८)स्वातंत्र्याची हाककाव्यसंग्रह१९९८वंदना प्रकाशन, मुंबई – मधु मंगेश कर्णिक
९)प्र. श्री. : एक पंच्याहत्तरीय साठवणचरित्र संपादन१९९८वंदना प्रकाशन, मुंबई – दिनकर गांगल
१०)Mauritius Friend : P. S. NerurkarEdited Book१९९८ग्रंथाली – कोमसाप उद्घाटन
११)कविता विश्वकाव्यसंग्रह (संपादित)१९९९वंदना प्रकाशन, मुंबई – लक्ष्मण लोंढे
१२)विसाव्या शतकातील कविताकाव्यसंग्रह (संपादित)२०००वंदना प्रकाशन, मुंबई – आकाशानंद (दूरदर्शन)
१३)सूर्य दिसत राहील तोपर्यंत ...काव्यसंग्रह२००२ (पहिली आवृत्ती)
२००५ (दुसरी आवृत्ती)
२०२४ (तिसरी आवृत्ती)
वंदना प्रकाशन, मुंबई – नारायण सुर्वे (पहिली आवृत्ती)
वंदना प्रकाशन, मुंबई (दुसरी आवृत्ती)
वंदना प्रकाशन, मुंबई – डॉ. भालचंद्र मुणगेकर (तिसरी आवृत्ती)
१४)डॉ. सुनील सावंत कवी आणि कवितासमीक्षा२००२वंदना प्रकाशन, मुंबई – नारायण सुर्वे
१५)ऐलानहिंदी काव्यसंग्रह२००४वंदना प्रकाशन, मुंबई – मंगेश पाडगावकर
१६)काळे पाणी, लाल सूर्यअनुवाद (हिंदी)२००६वंदना प्रकाशन, मुंबई – प्रभाकर पणशीकर
१७)वैद्यनाथ मिश्र नागार्जुन और नारायण सुर्वेशोध ग्रंथ२००६वंदना प्रकाशन, मुंबई – प्रभाकर पणशीकर
१८)श्री सिद्धिविनायक माहात्म्यआध्यात्मिक२००७वंदना प्रकाशन, मुंबई – जयंत साळगावकर
१९)श्री सिद्धिविनायक महिमाहिंदी२००९वंदना प्रकाशन, मुंबई – प्रभादेवी मंदिर
२०)ईश्वराद्वारे विश्वाच्या संविधानाची पुनर्व्याख्याअनुवाद (मराठी)२०१०वंदना प्रकाशन, मुंबई – वसुंधरा पेंडसे नाईक
२१)SINGE (होरपळ आत्मचरित्राचा इंग्रजी भावानुवाद)अनुवाद२०१८Academic Excellence, New Delhi

सविस्तर परिचय पहाण्यासाठी
सविस्तर जीवनप्रवास पहाण्यासाठी
पुस्तकांचा सविस्तर परिचय पहाण्यासाठी
सविस्तर पुरस्कार आणि सन्मान पहाण्यासाठी